सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये हळदीची आवक वाढली, वर्षभरात 1 हजार 899 कोटींची उलाढाल सांगली मार्केट यार्डात राजापुरी आणि परपेठ हळदीची उलाढाल 192 कोटींनी वाढली गेल्या वर्षभरात 1899 कोटी रुपयांची खरेदी-विक्री झाली 2021-22 या वर्षात शेतकऱ्यांना नैसर्गिक संकटांचा सामना करावा लागला. तरीही उलाढाल वाढली. शेतकरी हळद सुकविण्यासह अन्य प्रक्रिया करण्यासाठी आधुनिक तंत्राचा वापर करत आहेत. परपेठ हळदीची 1 लाख 16 हजार 217 क्विंटल आवक झाली असून, उलाढाल 103 कोटी 20 लाख सहा हजार 960 रुपयांची झाली दोन वर्षातील हळदीच्या आकडेवारीवर नजर टाकल्यास राजापुरी हळदीची आवक दोन लाख 93 हजार 314 क्विंटलने वाढली सांगली मार्केट यार्डात निघत असलेल्या हळदीच्या सौद्यासाठी देशभरातून व्यापारी येत आहेत परपेठ हळदीची आवक एक लाख 80 हजार 938 क्विंटल वाढली असून 86 कोटी 62 लाख 19 हजार 180 रुपयांनी खरेदी-विक्री वाढलीय.