‘हंगामा 2’ फेम अभिनेत्री प्रणिता सुभाष लवकरच आई होणार आहे.



सोशल मिडीयावर खास फोटो शेअर करत अभिनेत्रीने ही आनंदाची बातमी चाहत्यांसोबत शेअर केली आहे.



अभिनेत्री प्रणिता सुभाषने पती नितीनसोबतचे खास फोटो इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत, ज्यामध्ये ती त्याच्यासोबत रोमँटिक अंदाजात दिसत आहे.



फोटोंमध्ये, अभिनेत्रीच्या चेहऱ्यावर आई होण्याची चमक आणि आनंद स्पष्टपणे दिसत आहे.



अभिनेत्री प्रणिता सुभाषने तिच्या पतीच्या 34व्या वाढदिवसानिमित्त ही खास गोड बातमी शेअर केली आहे.



प्रणिताने गेल्या वर्षी 30 मे 2021 रोजी बेंगळुरूस्थित बिझनेसमन नितीन राजू यांच्याशी लग्न केले होते.