हिंदू धर्म मान्यतेनुसार तुळशीची वनस्पती अत्यंत पवित्र आहे. तुळशीला निव्वळ वनस्पती मानता येणार नाही.



तुळशीच्या पानांचा ज्योतिषीय उपाय केल्याने लक्ष्मीची कृपा प्राप्त होते.



तुळशीच्या सर्व भागांचे स्वतःचे महत्त्व आहे. बी, पानं, मूळ या सर्वांचे स्वतःचे फायदे आहेत.



सर्दी खोकला, श्वासाची दुर्गंधी, शरीराची प्रतिकारशक्ती वाढविणे, ताणतणाव कमी करणे, वजन कमी करणे, सर्पदंश, हृदयविकार, केस गळणे यामध्ये तुळशी खूप फायदेशीर आहे.



ज्या घरांमध्ये तुळशीचे रोप असते तेथे नेहमी सुख, शांती आणि समृद्धी राहते.



तुळशीची कोरडी पाने लाल कपड्याने बांधून आपल्या घराच्या डब्यात, कपाटात किंवा तिजोरीत ठेवल्यास लक्ष्मीची कृपा राहते आणि घरात सुख-समृद्धी येते.



तुळशीची कोरडी पाने पाण्यात किंवा गंगाजलात मिसळून घरभर शिंपडल्यास घरातून नकारात्मक ऊर्जा नष्ट होते आणि सकारात्मक ऊर्जा संचारते.



टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.