तुळजापूरची तुळजाभवानी ही कुलदैवत असल्यामुळे तुळजाभवानीच्या दर्शनाला राज्यातील तसेच तेलंगणा
आंध्र प्रदेश, गुजरात, कर्नाटक, राजस्थान यासह विविध राज्यातून भाविक येत असतात.
कुलाचार केल्यानंतर देवीला सोने, चांदी, मौल्यवान अलंकार भेट देत असतात.
या अलंकाराची मोजदाद सुरू असून त्यामध्ये 207 किलो सोने, 354 हिरे आणि 2586 किलो चांदी भक्तांनी दान केली आहे.
सन 2009 पासून आजपर्यंत सोने,चांदी, मौल्यवान अलंकार यांची मोजदाद झाली नव्हती.
जिल्हाधिकारी तथा संस्थानचे अध्यक्ष डॉ. सचिन ओंम्बासे यांच्या आदेशान्वये कडेकोट सुरक्षेत इन कॅमेरा सोन्याची मोजदाद सुरु आहे.
विशेष म्हणजे दान आलेले सोने, हिरे खरे आहेत की खोटे हे तपासणीसाठी मंदिर प्रशासनाने सोनाराची नियुक्ती केली आहे.
सन 2009 नंतर जमा झालेल्या तुळजाभवानीच्या सोने, चांदी, मौल्यवान अलंकार यांची मोजदाद 7 जूनपासून सुरु आहे.
12 जून पर्यंत 207 किलो सोने, 354 हिरे दान आले आहेत.
अंदाजे 65 कोटी रुपयाचे सोने असून अंदाजे 20 लाख रुपयाचे हिरे दान आले आहे.