प्रेक्षकांना ज्या व्यक्तिरेखांचा राग येतो त्या साकारताना एक अभिनेत्री म्हणून कस लागतो असं तिला वाटतं.
तुझे मी गीत गात आहे या मालिकेत ती मोनिका ही व्यक्तिरेखा साकारणार आहे.
मोनिका या भूमिकेचं वेगळेपण सांगताना प्रिया म्हणाली, ‘स्टार प्रवाहसोबत मी याआधी जयोस्तुते आणि शतदा प्रेम करावे या मालिका केल्या आहेत.'
'तुझेच मी गीत गात आहे मालिकेच्या निमित्ताने पुन्हा या लाडक्या वाहिनीसोबत जोडली जाणार आहे.', असंही तिनं सांगितलं
बालकलाकारांबाबत प्रिया म्हणाली, 'पिहू नावाच्या चिमुरडीसोबत माझे बरेचसे सीन आहेत. बालकलाकारांसोबत काम करताना नेहमीच मजा येते.'
'बाप-लेकीच्या नात्यात माझी म्हणजेच मोनिका या पात्राची नेमकी काय भूमिका असेल हे पहायचं असेल तर तुझेच मी गीत गात आहे ही मालिका नक्की पाहा.’ असं प्रियानं सांगितलं.
प्रियाच्या अभिनयाला प्रेक्षकांची नेहमी पसंती मिळते.