'शेरशाह' चित्रपटाच्या शूटिंगपासून अभिनेत्री कियारा अडवाणी आणि सिद्धार्थ मल्होत्रा यांच्या डेटिंगच्या बातम्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. परंतु, आता कियारा अडवाणी आणि सिद्धार्थ मल्होत्रा यांच्यात काहीही बिनसल्याच्या बातम्या समोर येत आहेत. 'भूल भुलैया 2' या चित्रपटाच्या ट्रेलर लाँचवेळी कियाराने असे काही सांगितले, ज्याचा संबंध ब्रेकअपच्या बातम्यांशी जोडला जात आहे. कियारा अडवाणी आणि कार्तिक आर्यन यांची प्रमुख भूमिका असलेल्या 'भूल भुलैया 2' चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला आहे. ट्रेलर लाँचच्या प्रसंगी अभिनेत्रीला एक प्रश्न विचारण्यात आला होता. त्याचे उत्तर देताना कियाराने अशी गोष्ट सांगितली की त्यामुळे चाहत्यांनाही धक्का बसला. तू तुझ्या स्वप्नातून किंवा तुझ्या आयुष्यातून कोणाला विसरशील? असा पश्न कियाराला विचारण्यात आला. यावेळी कियारा म्हणाली, 'अजिबात नाही, कारण मी ज्यांना भेटले ते माझ्या आयुष्याशी संबंधित होते. त्यामुळे मला कोणाला विसरायचे नाही. कियाराच्या या प्रश्नाचे सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला. कियाराने या प्रश्नाचे उत्तर देताच त्याच्या शेजारी बसलेला कार्तिक आधी कॅमेऱ्यासमोर पाहू लागला आणि नंतर खाली पाहू लागला.