अक्षरा सिंग ही भोजपुरी चित्रपटसृष्टीतील एक सुंदर अभिनेत्री आणि सर्वोत्कृष्ट गायिका म्हणून ओळखली जाते. अक्षराचा सोशल मीडियावरही चांगलाच बोलबाला आहे. तिचे लेटेस्ट फोटोशूट सध्या इंटरनेटवर चांगलेच व्हायरल होत आहे. या फोटोशूटमधील अक्षराच्या साधेपणावर चाहते खूपच खूश झाले आहेत. अक्षराने तिच्या सिंपल लूकचे काही फोटो इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत. अक्षराने तिचा बॉस लेडी लूक शेअर केला होता. या फोटोंमध्ये ती हिरव्या रंगाच्या पेंट सूटमध्ये दिसत आहे. अक्षराचे हे किलर डोळे चाहत्यांना खूप प्रभावित करतात. अक्षरा पांढऱ्या रंगाची कुर्ती परिधान करून वेगवेगळ्या पोज देत आहे. तिने केसात पिवळे फूलही घातले आहे. अक्षरा सिंहचा हा साधा लूक चाहत्यांना खूप आवडला आहे.