सुनिता धनगर

तत्कालीन मनपा शिक्षणाधिकारी सुनीता धनगर यांना 50 हजार रुपयांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून अटक करण्यात आली होती.

वैशाली झनकर

माध्यमिक शिक्षणाधिकारी वैशाली झनकर यांना आठ लाख रुपयांची लाच घेताना अटक करण्यात आली होती.

नरेश कुमार बहिरम

नाशिक तालुका तहसीलदार नरेशकुमार बहिरम यांना नुकतीच 15 लाखांची लाच घेताना अटक करण्यात आली.

दिनेश कुमार बागुल

दिनेशकुमार बागुल हे नाशिकच्या आदिवासी विभागात कार्यकारी अभियंता म्हणून कार्यरत होते.

सतीश खरे

सतीश खरे हे सहकार विभागात जिल्हा निबंधक म्हणून कार्यरत होते.

महेश कुमार शिंदे

महेशकुमार शिंदे हे भूमी अभिलेख कार्यालयात नाशिक जिल्हा अधीक्षक म्हणून कार्यरत असताना 50 हजारांची लाच घेताना अटक झाली.

महेश पाटील

महेश पाटील हे सार्वजनिक बांधकाम विभाग नंदुरबार येथे कार्यकारी अभियंता म्हणून कार्यरत असताना साडे तीन लाखांची लाच स्वीकारली.

अमर खोंडे

अमर खोंडे हे धुळे येथील महावितरण विभागात व्यवस्थापक म्हणून कार्यरत असताना दोन लाखांची लाच स्वीकारली.

विजय बोरुडे

विजय बोरुडे हे कोपरगावचे तहसीलदार असताना वीस हजार रुपयांची लाच स्वीकारताना त्यांना अटक करण्यात आली.

विठ्ठल मच्छिन्द्र काकडे

विठ्ठल मच्छिन्द्र काकडे हे पारनेर तहसील कार्यालय पुरवठा निरीक्षक म्हणून कार्यरत असताना लाच स्वीकारली.