सर्वात महाग केशर कोणते?

Published by: एबीपी माझा वेब टीम
Image Source: pexels

केशरला लाल सोने म्हणतात कारण ते जगातील सर्वात महागडे मसाले आहे.

Image Source: pexels

ज्याचा उपयोग अन्न, औषध आणि सौंदर्य प्रसाधनांमध्ये केला जातो.

Image Source: pexels

तुम्हाला माहीत आहे का की केशरमध्येही अनेक प्रकार असतात, ज्यांची किंमत आणि गुणवत्ता वेगवेगळी असते.

Image Source: pexels

तर जाणून घेऊयात जगात सर्वात महाग केशरची किंमत किती आहे.

Image Source: pexels

काश्मिरी मोंगरा केशर हे भारतातील सर्वात प्रीमियम केशर मानले जाते, ज्याची किंमत सुमारे 2.5 लाख ते 3 लाख प्रति किलो दरम्यान असते.

Image Source: pexels

मोगऱ्यामध्ये फक्त लाल भाग असतो, त्यामुळे तो सर्वात शुद्ध आणि सर्वात महाग मानला जातो.

Image Source: pexels

त्यानंतर इराणी सरगोल केशराचे जगात सर्वात जास्त उत्पादन होते, पण गुणवत्तेत काश्मिरी केशरपेक्षा कमी मानले जाते.

Image Source: pexels

स्विस बाजारपेठेत काश्मिरी केशरची खूप मागणी आहे, ज्यामुळे ते परदेशात पाच लाख रुपये प्रति किलोपर्यंत विकले जाते.

Image Source: pexels

स्पॅनिश ला मंचा केशर युरोपमधील सर्वात महागडे केशर मानले जाते.

Image Source: pexels

एकंदरीत सर्वात महागडे केशर काश्मिरी मोगरा आहे, जे जगातील सर्वात शुद्ध केशर मानले जाते.

Image Source: pexels