दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर यांनी मूव्ही स्टुडिओ आणि यूएफओ मुव्हीज यांच्याबरोबरच मेटावूडच्या सहकार्याने मेटाव्हर्समध्ये 'शेर शिवराज' चित्रपटाचा ट्रेलर रिलीज केला आहे



विशेष म्हणजे मेटाव्हर्सद्वारे लाँच होणारा 'शेर शिवराज' हा पहिलाच मराठी चित्रपट ठरला आहे.



गेल्या काही दिवसांपासून ‘मेटाव्हर्स’ नावाच्या संकल्पनेने आपल्या सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.



एका आभासी तंत्रज्ञानाद्वारे ओळख तयार करुन त्याद्वारे संवाद साधण्याचे माध्यम म्हणून मेटाव्हर्सकडे पाहिले जाते.



वेब 3.0 हे नव्याने आलेले इंटरनेटचे युग आहे. वेब 3.0 मध्ये फाइव्ह जी, ब्लॉकचेन, ऑगमेन्टेड रिअ‍ॅलिटी, व्हर्च्युअल रिअ‍ॅलिटी यांसारख्या तंत्रज्ञानाचा समावेश आहे.



हे तंत्रज्ञानदेखील थेट मेटाव्हर्सशी निगडितच आहे. वेब 3.0 मध्ये यूजर्स कोणत्याही मध्यस्थ व्यक्तीशिवाय विविध सोयी-सुविधांचा थेट लाभ घेऊ शकतात.