श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टच्यावतीने आज अंगारकी चतुर्थी च्या निमित्ताने बुधवार पेठेतील श्रीमंत दगडूशेठ गणपती मंदिरात स्वराभिषेक आयोजित करण्यात आला.
गारकी चतुर्थी च्या निमित्ताने ब्रम्हणस्पति सूक्त अभिषेक ,गायक निखिल महामुनी यांचा स्वराभिषेक,
सकाळी ८ ते १२ आणि दुपारी२ ते ६ गणेश याग , असे विविध धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले.
पहाटे ४ ते सकाळी ६ यावेळेत प्रसिद्ध गायक निखिल महामुनी यांनी श्रीं चरणी स्वराभिषेक अर्पण केला
स्वराभिषेकातून तू माझा देवा, खुले देवघर, ओंकार तव ,अन्नपूर्णा, कृष्ण सुदाम ,
अष्टविनायका अशी विविध प्रकारची गीते ऐकण्याची संधी पुणेकरांना मिळाली