KGF-2 ला भारतात जबरदस्त ओपनिंग मिळाली. यासोबतच हा चित्रपट दररोज नवनवे रेकॉर्ड बनवत आहे या चित्रपटाने चौथ्या दिवशी हिंदी पट्ट्यात तब्बल 50.35 कोटींची कमाई केली आहे KGF-2 ने केवळ हिंदी बेल्टमध्ये 193.99 कोटींचा व्यवसाय केला आहे. हिंदी व्हर्जनमध्ये चार दिवसांत एवढी कमाई करणारा हा पहिलाच चित्रपट आहे याआधी 'बाहुबली-2'ने जवळपास 168 कोटींची कमाई केली होती. KGF-2 या चित्रपटाने अवघ्या चार दिवसांत तब्बल 551 कोटी रुपये कमावले आहेत. 100 कोटींच्या बजेटमध्ये बनलेल्या या चित्रपटात कन्नड अभिनेता यश व्यतिरिक्त संजय दत्त आणि रवीना टंडन देखील आहेत.