श्वेता तिवारीची मुलगी पलक तिवारी तिच्या ग्लॅमरस लूकमुळे नेहमीच चर्चेत असते. पलक सोशल मीडियावरही खूप सक्रिय असते. पलक तिवारीने काही दिवसांपूर्वी गुलाबी ड्रेसमधील तिच्या पारंपरिक लूकचे फोटो शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये तिचा किलर लूक आणि स्माईल चाहत्यांचे लक्ष वेधून घेत आहे. पलक तिवारीची जबरदस्त फॅन फॉलोइंग आहे. सोशल मीडियावर तिचे फॉलोअर्सही चांगले आहेत. पलक तिवारी 'रोजी' या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. या चित्रपटाचा टीझर आधीच आला आहे. पलक सलमान खानच्या 'कभी ईद कभी दिवाळी' या चित्रपटात दिसणार असल्याच्या बातम्याही आल्या होत्या. मात्र, या वृत्ताला अद्याप दुजोरा मिळालेला नाही.