चेन्नईविरुद्धच्या सामन्यात नाबाद 88 धावा करत शिखरने 6 हजार धावांचा टप्पा पार केला. शिखरने 200 सामनय्यात 6 हजार 86 रन बनवले आहेत. दरम्यान आयपीएल इतिहासात सर्वाधिक धावा करणाऱ्यांत शिखर दुसऱ्या स्थानावर आहे. पहिल्या स्थानावर 6 हजार 411 धावांसह विराट आहे. तिसऱ्या स्थानावर रोहित शर्मा 5 हजार 764 रनांसह आहे. यादीत एकमेव विदेशी असून डेव्हिड वॉर्नरने 5 हजार 668 रन बनवले आहेत. मिस्टर आयपीएएल सुरेश रैनाच्या नावावर 5 हजार 528 रन आहेत. आयपीएलच्या इतिहासात अनेक अजूनही फलंदाजांनी धावांचा पाऊस पाडला आहे. यात ख्रिस गेल, शेन वॉट्सनसारखे अनेक दिग्गज आहेत. अलीकडे बटलर, केएल राहुलसारखे युवा या स्पर्धेत आहेत.