टीआरपीच्या शर्यतीत 'आई कुठे काय करते' ही मालिका पहिल्या क्रमांकावर आहे. या मालिकेला 43.4 रेटिंग मिळाले आहे.



'रंग माझा वेगळा' ही मालिका सध्या लोकप्रियतेच्या शिखरावर असून ही मालिका टीआरपीच्या रेसमध्ये दुसऱ्या स्थानावर आहे. या मालिकेला 40.02 रेटिंग मिळाले आहे.



टीआरपी लिस्टमध्ये 'ठिपक्यांची रांगोळी' ही मालिका तिसऱ्या स्थानावर आहे. या मालिकेला 39.6 रेटिंग मिळाले आहे.



'माझी तुझी रेशीमगाठ' ही मालिका टीआरपी रिपोर्टनुसार चौथ्या स्थानावर आहे. मालिकेतील नव्या ट्विस्टमुळे ही मालिका प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहे. या मालिकेला 37.6 रेटिंग मिळाले आहे.



'सुख म्हणजे नक्की काय असतं' ही मालिका टीआरपीच्या शर्यतीत पाचव्या स्थानावर आहे. टीआरपी रिपोर्टनुसार या मालिकेला 35.04 रेटिंग मिळाले आहे.



'स्वाभीमान' ही मालिका सहाव्या क्रमांकावर आहे. या मालिकेला 34.1 रेटिंग मिळाले आहे.



टीआरपीच्या शर्यतीत 'मन उडू उडू झालं' ही मालिका सातव्या क्रमांकावर आहे. या मालिकेला 32.1 रेटिंग मिळाले आहे.



'फुलाला सुगंध मातीचा' ही मालिका टीआरपी रिपोर्टमध्ये आठव्या क्रमांकावर आहे. या मालिकेला 31.0 रेटिंग मिळाले आहे.



नवव्या स्थानावर 'तुझेच मी गीत गात आहे' ही मालिका आहे. या मालिकेला 28.6 रेटिंग मिळाले आहे.



'लग्नाची बेडी' ही मालिका टीआरपीच्या शर्यतीत दहाव्या क्रमांकावर आहे. या मालिकेला 27.6 रेटिंग मिळाले आहे.