मराठी मनोरंजन विश्वातील प्रसिद्ध अभिनेत्री प्राजक्ता माळी (Prajaktta Mali ) सध्या तिच्या सोशल मीडिया पोस्टमुळे अधिक चर्चेत असते. नुकतेच प्राजक्ता माळीने स्वतःचे काही सुंदर फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. अभिनेत्रीचे हे फोटो पाहून चाहते चांगलेच घायाळ झाले आहेत. या फोटोंमधील प्राजक्ता मळीचा अंदाज पाहता सगळेच तिच्या या लुकवर फिदा झाले आहेत. मात्र, हे फोटो पोस्ट करताना तिने एक अशी चूक केली, जी नेटकऱ्यांच्या लगेच लक्षात आली. यामुळेच आता ती पुन्हा एकदा सोशल मीडियावर ट्रोल होत आहे. मराठमोळी अभिनेत्री प्राजक्ता माळी हिने तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवर तिचे काही सुंदर फोटो शेअर केले आहेत. या फोटोंना तिने ‘ऋतू बरवा’ या गाण्यातील ‘थरथरत्या अधरावर, प्रणयी संकेत नवा..ऋतू हिरवा, ऋतू बरवा…’ या ओळींचे कॅप्शन दिले आहे. प्राजक्ताने कवियत्रीचे नाव लिहिताना ‘शांताबाई शेळके’ऐवजी चुकून ‘शांती शेळके’ असे लिहिले. मात्र, फोटोंमधील प्राजक्ताचा मनमोहक अंदाज पाहून, चाहते देखील तिच्या रुपाला भुलले आहेत. सो