जीवन विमा ही आजच्या काळात प्रत्येक व्यक्तीची गरज बनली आहे. लाईफ इन्शुरन्सचे अनेक प्रकार आहेत. टर्म लाइफ इन्शुरन्स, ULIP, एंडोमेंट इन्शुरन्स योजना, मनी बॅक इन्शुरन्स आदी प्रकार आहेत. आजकाल योग्य विमा निवडणे हे अवघड काम आहे. परंतु काही गोष्टी लक्षात घेऊन तुम्ही स्वतःसाठी योग्य विमा योजना निवडू शकता. तुम्ही तुमच्या विमा योजनेचा कालावधी आणि किती कव्हर आवश्यक आहे हे निश्चित करा. कोणती योजना तुम्हाला कमी प्रीमियमसह अधिक कव्हर देत आहे हे पाहा. त्यासाठी विमा योजनांची तुलना करू शकता. कमी प्रीमियमसाठी तुम्ही स्वस्त पॉलिसी निवडू नये. संबंधित विमा योजनेत मिळणाऱ्या लाभांची तुलना करावी. तुमच्या पश्चात विमा तुमच्या कुटुंबाला आर्थिक संरक्षण देतो.