यूएस स्पेस एजन्सी नासाने आपल्या सर्वात शक्तिशाली स्पेस टेलिस्कोप जेम्स वेबमधून ब्रम्हांडाचे चार नवीन रंगीत फोटो जारी केले आहेत.



नासाकडून दावा करण्यात आला आहे की, ही विश्वातील आतापर्यंतचे सर्वात हाय-रिझोल्यूशन रंगीत फोटो आहेत.



नासाने जेम्स वेब टेलिस्कोपमधून घेतलेल्या ब्रम्हांडाचे चार नवीन फोटो प्रसिद्ध केले आहेत.



या चित्रांमध्ये अंतराळातील आकाशगंगेची सुंदर दृश्ये टिपण्यात आली आहेत.



नासाने सांगितले की, या दुर्बिणीमुळे विश्वाकडे पाहण्याचा जगाचा दृष्टिकोन नुकताच विस्तारला आहे.



सोमवारी नासाने नुकतेच एक छायाचित्र प्रसिद्ध केले. पहिले चित्र आकाशगंगांनी भरलेले होते, जे आतापर्यंत पाहिलेले विश्वाचे सर्वात गडद व अद्भूत दृश्य होते.



NGC 3132 नेबुलाचे दुसरे चित्र दोन तारे नष्ट होताना दाखवले आहेत. एक अंधुक तारा जो त्याच्या कक्षेतील लहान तेजस्वी ताऱ्यापर्यंत मर्यादित आहे तो हळूहळू नष्ट होत आहे.



या चित्रात पाच आकाशगंगा एकत्र दिसत आहेत. यापैकी चार एकमेकांशी जोडलेले आहेत, तर एक वेगळे आहे.



या जेम्स वेब स्पेस टेलिस्कोप फोटोमध्ये कॉस्मिक क्लिफ्समध्ये धूळ आणि वायूच्या पडद्याआड लपलेले छोटे तारे दिसत आहेत.