झी मराठीवर प्रसारित होणारी मालिका 36 गुणी जोडी आता इंग्रजी भाषेत डब होऊन झी वन आफ्रिका वाहिनीवर 36 रिझन्स नावाने प्रसारित होणार आहे!. यात आयुष साळुंखे आणि अनुष्का सरकटे मुख्य भूमिकेत होते. वेदांत आणि अमुल्या हे दोघेही ही भिन्न स्वभावाचे आणि वेगळे आहेत. नेहमी एकमेकांशी भांडण करतात, पण शेवटी भांडण करणारे एकमेकांच्या प्रेमात पडूनच जातात. अशी ही कॉमेडी आणि रोमँटिक अशी ही मजेदार सिरीयल आता आपण झी वन आफ्रिकामध्ये इंग्रजी भाषेत बघायला मिळणार आहे. या सिरीयल चा रिमेक एकूण ७ भाषांमध्ये झाला आहे या सिरियलचे नाव इंग्रजी मधून '३६ रिजन्स' असं आहे त्यामुळे फेमस झालेली जोडी आफ्रिके च्या प्रेक्षकांना आवडतेय की नाही याची उत्सुकता सगळ्यांनाच आहे आधी ही 'तू तेव्हा तशी' ही सिरीयल 'झी वन आफ्रिकाने' डब करून इंग्रजी भाषेत प्रसारित केली आहे.