आज नौदल दिनाच्या निमित्ताने मुंबईच्या गेट वे ऑफ इंडियाच्या समोर खास कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते
वेस्टर्न नेव्हल कमांड (पश्चिम नौदल कमांड ) तर्फे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे
मुंबईतील नेव्हल डॉकयार्ड येथे जगातील सर्वात मोठा राष्ट्रध्वज प्रदर्शित करण्यात आला आहे.
हा राष्ट्रध्वज 225 फूट लांबी आणि 150 फूट रुंदीचा आहे
या ध्वजाचे वजन सुमारे 1400 किलो असून हा ध्वज खादीपासून बनवलेला आहे.
आझादी का अमृत महोत्सवाचा भाग म्हणून खादी आणि ग्रामोद्योग आणि आयोगाने याची संकल्पना आणि निर्मिती केली आहे
नौदल दिनानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
भारतीय नौदलाच्या बँडचा नेत्रदीपक बीटिंग रिट्रीट सोहळा, नौदलाच्या हेलिकॉप्टरचा ओप डेमो, सी कॅडेट कॉर्प्स आणि किलर्स स्क्वॅड्रनच्या कवायती या कार्यक्रमात सुरु आहेत.
ध्वजाचे अनावरण करण्यात आले असून तो देशाला अर्पण करण्याची जबाबदारी नौदलाने स्विकारली आहे.
नौदल दिनानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.