'द केरळ स्टोरी' हा चित्रपट 5 मे रोजी प्रेक्षकांच्या भेटीस आला आहे.



'द केरळ स्टोरी' या चित्रपटाला प्रेक्षकांची पसंती मिळत आहे पण काही लोक या चित्रपटाचा विरोध करत आहेत.



पश्चिम बंगालमध्ये या चित्रपटावर बंदी घालण्यात आली आहे. पण काही राज्यांमध्ये हा चित्रपट टॅक्स फ्री करण्यात येत आहे.



काही दिवसांपूर्वी हा चित्रपट मध्य प्रदेश राज्यात करमुक्त करण्यात आला.



आता लवकरच उत्तर प्रदेश राज्यात हा चित्रपट करमुक्त करण्यात येणार आहे.



अदा शर्मा, योगिता बिहानी, सोनिया बानी, सिद्धी इदनानी या कलाकरांनी 'द केरळ स्टोरी' या चित्रपटात प्रमुख भूमिका साकारली आहे.



सुदीप्तो सेन यांनी या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे.



'द केरळ स्टोरी' या सिनेमाची निर्मिती 30 कोटींच्या बजेटमध्ये करण्यात आली आहे.



'द केरळ स्टोरी' या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर कोट्यवधींची कमाई केली आहे.



द केरळ स्टोरी या चित्रपटाची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत होते.