'द केरळ स्टोरी' हा चित्रपट काल (5 मे) प्रेक्षकांच्या भेटीस आला आहे.
चित्रपटाच्या कथानकाची चर्चा सध्या सोशल मीडियावर होत आहे.
आता आज तकला दिलेल्या मुलाखतीमध्ये द केरळ स्टोरी या चित्रपटाचे सिनेमॅटोग्राफर प्रशांतनु महापात्रा यांनी या चित्रपटाचं शूटिंग कसं झालं? याबाबत सांगितलं आहे.
प्रशांतनु महापात्रा म्हणाले, ' द केरळ स्टोरी या चित्रपटातील शालिनीसोबत टेंटमध्ये सतत बलात्कार होत आहे, असं एका सिनमध्ये दाखवण्यात आलं होतं. आम्ही तो सिन प्रतिकात्मक पद्धतीने मांडला.'
'नीमाच्या भूमिकेसोबत होणाऱ्या बलात्काराचा सिन दाखवता आम्ही पीडित आणि बलात्कारी यांना एकत्र दाखवलं नाही. आम्ही दोन्ही पात्र वेगळे केले. एकीकडे फ्रेममध्ये फक्त मुलगा दाखवून त्याचा उन्माद दाखवला आहे, तर दुसरीकडे मुलीची असहायता दुसऱ्या फ्रेममध्ये दाखवली आहे.' असंही प्रशांतनु महापात्रा यांनी सांगितलं.
अदा शर्मा, योगिता बिहानी, सोनिया बानी, सिद्धी इदनानी यांनी 'द केरळ स्टोरी' या चित्रपटात प्रमुख भूमिका साकारली आहे
'द केरळ स्टोरी' या चित्रपटाचं दिग्दर्शन सुदीप्तो सेन यांनी केलं आहे.
पुढे प्रशांतनु महापात्रा म्हणाले, 'सीरिया आणि अफगाणिस्तानची सीमा दाखवण्यासाठी आम्ही लडाखच्या खोऱ्यात शूटिंग केले. आम्ही 15 दिवस रोज 10 ते 12 तास शूटिंग करत होतो. '
द केरळ स्टोरी या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला.
'द केरळ स्टोरी' या सिनेमाची निर्मिती 30 कोटींच्या बजेटमध्ये करण्यात आली आहे.