'द केरळ स्टोरी' हा सिनेमा सध्या चर्चेत आहे. रिलीजआधीच वादाच्या भोवऱ्यात अडकलेला हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर जादू दाखवण्यात यशस्वी झाला आहे. 'द केरळ स्टोरी' हा सिनेमा 5 मे 2023 रोजी प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. रिलीजच्या दोन दिवसांत या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला आहे. ओपनिंग डेला या सिनेमाने 8.03 कोटींची कमाई केली होती. दुसऱ्या दिवशी या सिनेमाने आता 12.50 कोटींचा गल्ला जमवला आहे. 'द केरळ स्टोरी' या सिनेमाची निर्मिती 40 कोटींच्या बजेटमध्ये करण्यात आली आहे. केरळमधील मुलींचं धर्म परिवर्तन करुन त्यांना दहशतवादी संघटना ISIS मध्ये कसं सामील केलं जातं हे सांगणारा 'द केरळ स्टोरी' हा सिनेमा आहे. 'द केरळ स्टोरी' हा सिनेमा वीकेंडला किती कमाई करतो याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. 'द केरळ स्टोरी' या सिनेमाने प्रेक्षकांची मने जिंकली आहेत.