'खतरों के खिलाडी' या कार्यक्रमात शिव ठाकरे सहभागी होणार आहे. 'खतरों के खिलाडी 13'च्या शूटिंगला लवकरच सुरुवात होणार आहे. 'खतरों के खिलाडी'च्या निर्मात्यांनी नव्या पर्वातील स्पर्धकांमध्ये शिव ठाकरेच्या नावावर शिक्कामोर्तब केलं आहे. 'खतरों के खिलाडी 13'च्या स्पर्धकांमधील शिव ठाकरे सर्वात महागडा स्पर्धक आहे. मीडिया रिपोर्टनुसार, शिव ठाकरेची लोकप्रियता लक्षात घेत 'खतरों के खिलाडी'च्या निर्मात्यांनी त्याला चांगलच मानधन दिलं आहे. 'खतरों के खिलाडी 13'च्या एका एपिसोडसाठी शिव ठाकरेने 5-8 लाख रुपये घेतले आहेत. 'बिग बॉस 16'च्या घरातील शिव ठाकरे उत्कृष्ट खेळाडू होता. 'आपला माणूस' म्हणून ओळख असलेला शिव अल्पावधीतच लोकप्रियतेच्या शिखरावर पोहोचला आहे. शिव 'खतरों के खिलाडी 13' कसं खेळतो याकडे चाहत्यांचं लक्ष लागलं आहे. आता आईचा आशीर्वाद घेऊन 'खतरों के खिलाडी 13' गाजवायला शिव ठाकरे सज्ज झाला आहे.