ऑक्सफर्ड रॉयल अकॅडमीने नामांकन दिलेल्या विषयांतील एयरोस्पेस इंजिरीनिअरिंग हा सर्वात कठीण विषय आहे. त्यानंतर दुसऱ्या क्रमांंकाचा सर्वात कठीण विषय हा कायद्याचा (Law) येतो. तिसरा सर्वाधिक मागणी असलेला पण तितकाच कठीण असलेला विषय म्हणजे चार्टर्ड अकाउंटन्सी (Chartered Accountancy). वास्तुशास्त्र या विषयाला देखील परदेशात तितकंच महत्त्व आहे. रसायनशास्त्र या विषयात जर तुम्हाला आवड असेल तर तुम्ही भारतासह परदेशात ही पदवी घेऊ शकता. मेडिसिन हा विषय देखील ऑक्सफर्ड रॉयल अकॅडमीने सर्वात कठीण विषय म्हणून निवडला आहे. फार्मसी हा विषय 7 व्या क्रमांकावर आहे. मानसशास्त्र हा विषय देखील कठीण विषयांच्या यादीत येतो. सांख्यिकी (Statistic) हा विषय तसा कठीण आहे. ऑक्सफर्डने या विषयाला नववा क्रमांक दिला आहे. नर्सिंग हे अत्यंत जोखमीचं आणि जबाबदारीचं काम. फिजिक्स हादेखील सर्वात कठीण विषयांच्या यादीत आहे. सूर्यमालेतील ग्रह, तारे, नक्षत्रांचा अभ्यास या Astrophysics या विषयात केला जातो. बायोमेडिकल इंजिरीनिअरिंग हा विषय देखील अत्यंत कठीण विषय आहे. Astronomy हा विषय 14 व्या क्रमांकावर आहे. दंत चिकित्सा (Dentistry) हा विषय ऑक्सफर्ड रॉयल अकॅडमीने 15 व्या क्रमांकावर नामांकन दिलं आहे.