2020 मध्ये 20 रुपयांचं नाण हे विकसित करण्यात आलं. तसेच 2020 मध्येचं या नाण्याचं वितरण देखील करण्यात आलं होतं. 20 रुपयांचं नाणं हे 8.54 ग्रॅमचं असतं. तसेच त्याची रुंदी ही 27 MM इतकी असते. हे नाणं तांबं, जस्त आणि निकेल या धातूंपासून बनवलेलं असतं. हे नाणं नॅशनल इन्स्टीट्यूट ऑफ अहमदाबाद या संस्थेने तयार केलं आहे. या नाण्याच्या एका बाजूला अन्नधान्यचं चिन्ह आहे. तर नाण्याच्या मागील बाजूस मोठ्या अंकात 20 रुपये असं लिहिलं आहे. 10 रुपयांचं नाणं जारी करण्यात आल्यानंतर दहा वर्षांनी 20 रुपयांचं नाणं जारी करण्यात आलं आहे. नाण्याच्या दर्शनी भागावर अशोक स्तंभाचे निशाण असून त्यावर सत्यमेव जयते असं लिहिण्यात आलं आहे.