29 जुलै 2010 रोजी रशिया मधील सेंट पीटर्सबर्ग येथे भरलेल्या व्याघ्र परिषदेत हा दिवस जागतिक व्याघ्र दिन म्हणून घोषित करण्यात आला. वाघांच्या नैसर्गिक निवासस्थानाचे संरक्षण करण्यासाठी जागतिक यंत्रणेला चालना देणे आणि व्याघ्र संवर्धनासाठी जनजागृती करणे हे प्राथमिक लक्ष्य आहे. मानवी गरजांसाठी जंगलांची तोडणी कमीत कमी केल्यास जंगलांची बचत होईल ज्यामुळे वाघांच्या नैसर्गिक अधिवासात बचत होईल. म्हणूनच व्याघ्र दिन साजरा केला जातो. राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरणाचा अहवालानुसार, 2017 पासून महाराष्ट्रात 134 वाघांच्या मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. महाराष्ट्रात 2017 साली 21 मृत्यू, 2018 साली 22, 2019 साली 18, 2020 साली 16, 2021 साली 40 तर जुलै 2022 पर्यंत 17 वाघांचा मृत्यू झाला आहे. महाराष्ट्रात एकूण महाराष्ट्रात सहा व्याघ्र प्रकल्प आहेत. तर, देशात एकूण तीन हजारांहून अधिक वाघांची संख्या आहे. जसे पांढरे वाघ, पांढरे काळे पट्टे असलेले तपकिरी वाघ, काळे पट्टे असलेले तपकिरी वाघ असे विविध रंगांचे वाघ आहेत. आतापर्यंत जवळपास बाली वाघ, कॅस्पियन टायगर, जावन टायगर आणि टायगर हायब्रीड या प्रजाती नामशेष झाल्या आहेत.