बिगबॉसच्या घरात मालवणी बोलत प्रेक्षकांची मनं जिंकणारी
कोकण हार्टेड गर्ल आता या शोमुळे प्रचंड लोकप्रिय झाली
असून घरोघरी तिला ओळखलं जाऊ लागलंय.
बिग बॉस तर संपलं आता लग्न कधी करणार अशा कमेंट्स आता तिला येऊ लागल्या आहेत.
त्यामुळं तिच्या लग्नाची आणि होणाऱ्या नवऱ्याचं चाहत्यांच्या मनात कुतूहल निर्माण झालं आहे.
दरम्यान, तिनं लवकरच लग्नबंधनात अडकणार असल्याचं सांगितलंय.
आता तिच्या होणाऱ्या नवऱ्यानं तिला आता एक सुंदर गिफ्ट दिलंय.
सोशल मिडीयावर या गिफ्टचा फोटो टाकत तिनं पुन्हा एकदा चाहत्यांचं लक्ष वेधून घेतलंय.