भाऊच्या धक्क्यावर मोठ्या घडामोडी घडत आहेत. या आठवड्यात घन:श्याम दरवडे हा एलिमिनेट झाला आहे. म्हणजेच घन:श्याम दरवडेचा बिग बॉस मराठीच्या घरातील प्रवास संपला आहे. आठवड्यात बिग बॉसच्या घरात एकूण सात सदस्य नॉमिनेट झाले होते. घन:श्याम दरवडे, निक्की तांबोळी, आर्या जाधव, अभिजित सावंत, धनंजय पोवार, सूरज चव्हाण, अरबाज पटेल यांचा समावेश होता यापैकी धनंजय पोवार, अभिजित सावंत यासारखे स्पर्धक अनेकवेळा नॉमिनेट झाले आहेत. यावेळीच्या एलिमिनेशनमध्ये कोणाचा नंबर येणार, याची सर्वांनाच उत्सुकता होती. या आठवड्यात घन:श्याम दरवडे बिग बॉसच्या घरातून बाहेर पडला आहे. बिग बॉस मराठीच्या घरात सध्या वेगवेगळे ट्विस्ट येत आहेत. घरातून बाहेर पडल्यानंतर छोटा पुढारीचे मनोगत