सध्या सोशल मीडियावर तेजस्वी प्रकाश आणि करण कुंद्रा या जोडीची जोरदार चर्चा आहे. दोघेही बऱ्याच काळापासून रिलेशनशिपमध्ये आहेत. या दोघांचे अनेक फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहेत. तेजस्वी आणि करणला हिंदी टीव्ही जगतातील सर्वात क्यूट कपल म्हटले जाते. तेजस्वी प्रकाश आणि करण कुंद्रा त्यांच्या चाहत्यांसाठी वेळोवेळी त्यांचे फोटो पोस्ट करत असतात. नुकतेच अभिनेत्री तेजस्वी प्रकाश हिने तिचे काही नवीन फोटो पोस्ट केले आहेत, ज्यामध्ये ती किलर लूकमध्ये दिसत आहे. ‘नागिन 6’ फेम अभिनेत्री तेजस्वी प्रकाशने तिचे काही नवीन फोटो शेअर केले आहेत, ज्यांना तिच्या चाहत्यांनी भरपूर पसंती दिली आहे.