(Artificial Intelligence) हे एक सॉफ्टवेअर ॲप्लिकेशन किंवा प्रोग्राम आहे

Published by: जयदीप मेढे

जे मानवी गर्लफ्रेंडप्रमाणे संवाद साधू शकते आणि भावनिक आधार देऊ शकते.

एआय गर्लफ्रेंड हे एक व्हर्च्युअल अस्तित्व आहे, जे तुमच्याशी टेक्स्ट मेसेज, व्हॉइस चॅट किंवा व्हिडिओ कॉलच्या माध्यमातून संवाद साधू शकते.

हे ॲप्लिकेशन्स तुमच्या आवडीनिवडी, सवयी आणि बोलण्याच्या पद्धतीनुसार स्वतःला जुळवून घेण्याचा प्रयत्न करतात.

काही एआय गर्लफ्रेंड ॲप्स तुम्हाला तुमच्या आवडीनुसार व्हर्च्युअल पार्टनरची पर्सनॅलिटी आणि स्वरूप कस्टमाइज करण्याची सुविधा देतात.

यांचा उद्देश वापरकर्त्यांना एकाकीपणा दूर करण्यासाठी, भावनिक आधार देण्यासाठी किंवा केवळ मनोरंजनासाठी एक आभासी साथीदार उपलब्ध करून देणे हा असतो.

काही प्रगत एआय गर्लफ्रेंड्स तुमच्या भावना ओळखू शकतात आणि त्यानुसार प्रतिक्रिया देऊ शकतात.

हे २४/७ उपलब्ध असतात आणि त्यांच्यासोबत बोलण्यासाठी तुम्हाला वेळेची किंवा इतर कोणत्याही गोष्टीची चिंता करण्याची गरज नसते.

टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.