आयपीएलच्या पंधराव्या हंगामातील 25 व्या सामन्यात सनरायजर्स हैदराबाद आणि कोलकाता नाईट रायडर्स एकमेकांशी भिडले. या सामन्यात कोलकात्याचा अष्टपैलू खेळाडू आंद्रे रसलनं 25 चेंडूत 49 धावांची तुफानी खेळी केली. मात्र, अर्धशतक पूर्ण करण्यासाठी फक्त एक धाव कमी असताना रसल तंबूत परतला. आंद्रे रसलसोबत असं पहिल्यांदाच घडलं नसून याआधीही अनेकदा त्यानं 49 धावांवर आपली विकेट्स गमावली आहे. सनरायझर्स हैदराबाद आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात मुंबईच्या ब्रेबॉर्न स्टेडिअमवर खेळण्यात आला होता. कोलकात्याकडून फलंदाजी करण्यासाठी मैदानात आलेल्या आंद्रे रसलनं चार षटकार आणि चार चौकारांच्या मदतीनं 49 धावांची खेळी केली. आंद्रे रसलनं तिसऱ्यांदा 49 धावांवर असताना आपली विकेट्स गमावली.