अभिनेत्री सोनम कपूरच्या दिल्लीतील घरातून रोख रक्कम आणि दागिने चोरल्याप्रकरणी पोलिसांना मोठे यश मिळाले आहे. सोनम कपूरच्या सासूचे चोरीचे दागिने विकत घेणाऱ्या सोनाराला दिल्ली पोलिसांच्या गुन्हे शाखेने अटक केली आहे. दिल्ली पोलिसांच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने गुरुवारी ही माहिती दिली. अभिनेत्री सोनम कपूरच्या दिल्लीतील निवासस्थानी काम करणाऱ्या एका नर्सने पतीसह सोनमच्या घरातून 2.4 कोटी रुपयांची रोख रक्कम आणि दागिने चोरले होते. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, देव वर्मा (४०) असे या सोनाराचे नाव असून तो कालकाजी येथील रहिवासी आहे. पीटीआयने दिलेल्या वृत्तानुसार, देव वर्मा यांच्याकडून 1 कोटी रुपयांहून अधिक किमतीचे दागिने जप्त केले आहेत