कोरोना साथीनंतरच्या कर्मचाऱ्यांच्या अपेक्षा समजून घेण्यासाठी 'गोदरेज इंटेरिओ'च्या 'वर्कस्पेस अँड एर्गोनॉमिक्स रिसर्च' सेलने देशव्यापी अभ्यास केला
यामध्ये कर्मचाऱ्यांची कामावर परतण्याची चिंता, ऑफिस स्पेसच्या पारंपरिक वापरात झालेले बदल आणि घरातून आणि कार्यालयातून काम करण्याविषयीची मते यासारख्या विविध पैलूंचा खुलासा केला
21 ते 56 वर्षे वयोगटातील एकूण 350 कार्यालयीन कर्मचाऱ्यांनी संशोधनात भाग घेतला
कर्मचाऱ्यांना कार्यालयात परत येण्याबाबत चिंता आहेत
अनेक कार्यालयांमधील आरोग्य आणि सुरक्षिततेची चिंता या अभ्यासात उघड झाली
अभ्यासानुसार कार्यालयात परत येण्याबाबत कर्मचार्यांच्या मुख्य चिंता म्हणजे 90 टक्के कार्यालयात कोरोनाचा संसर्ग होतो
86 टक्के लोकांना सध्याच्या जीवनशैलीशी तडजोड करावी लागेल असे वाटते
84 टक्के कर्मचाऱ्यांना काम आणि आयुष्य यांच्यामधील समतोल बिघडण्याची भीती वाटते
81 टक्के कर्मचाऱ्यांना लांब प्रवास करावा लागणार याची चिंता वाटते
71 टक्के जणांना पालक आणि मुलांची काळजी कशी घेणार हा प्रश्न सतावतो
अभ्यास असेही दिसून आले की 68 टक्के कर्मचारी कार्यालयात परत येण्यास उत्सुक आहेत