बॉलिवूड अभिनेत्री तारा सुतारिया काही दिवसांपूर्वी एका फॅशन शोमध्ये शो स्टॉपर बनली होती.

तारा गोल्डन ड्रेसमध्ये रॅम्पवर दिसून आली. ज्यामध्ये ती अत्यंत सुंदर दिसत होती.

थाय हाय स्लिट ड्रेस आणि बॅकवर कटआउट ताराचा लूक भारीच दिसत होता.

तारानं आउटफिट्सशी मॅचिंग गोल्डन मेकअप केला होता. तर तिनं केस मोकळे ठेवले होते.

तारानं या फॅशन शोमध्ये डिझायनर 'डॉली जे'साठी रॅम्प वॉक केला.

तारा नेहमीच आपले हॉट आणि ग्लॅमरस फोटो शेअर करत असते.

ताराच्या वर्कफ्रंटबाबत बोलायचं झालं तर, तिची मुख्य भूमिका असलेला 'हिरोपंती 2' रिलीज झाला आहे.

'हिरोपंती 2'मध्ये तारानं अभिनेता टायगर श्रॉफसोबत स्क्रिन शेअर केली आहे.

यापूर्वी तारा अभिनेता सुनिल शेट्टीचा मुलगा अहान शेट्टीची डेब्यू फिल्म 'तडप'मध्ये दिसून आली होती.

'तडप'ला बॉक्सऑफिसवर फारशी कमाई करता आली नाही.

ताराच्या वैयक्तिक आयुष्याबाबत बोलायचं झालं तर, ती अभिनेत्री करिना कपूरचा मावस भाऊ अरमान जैनसोबत रिलेशनशिपमध्ये आहे.