बॉलिवूडची ‘देसी गर्ल’ अभिनेत्री प्रियांका चोप्रा सोशल मीडियावर चाहत्यांच्या हृदयाचे ठोके वाढवताना दिसत आहे. अलीकडेच प्रियांका चोप्राने गोल्फ खेळतानाचे काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये प्रियांका चोप्रा पांढऱ्या आणि राखाडी रंगाच्या क्रॉप टॉप आणि फिट स्कर्टमध्ये दिसत आहे. अभिनेत्रीसोबत तिचा पती निक जोनासही मित्रांसोबत गोल्फ खेळण्यासाठी आला होता. या फोटोंवर कमेंट करताना निक जोनासने लिहिले की, ‘तू इतकी हॉट का आहेस?’ अभिनेत्री प्रियांका चोप्रा आणि अमेरिकन गायक निक जोनास काही महिन्यांपूर्वीच सरोगसीद्वारे छोट्या मुलीचे पालक बनले. प्रियांकाने अद्याप आपल्या मुलीची झलक जगाला दाखवलेली नाही. प्रियांका आणि निकच्या मुलीच्या नावावरून बराच सस्पेन्स निर्माण झाला होता. मीडिया रिपोर्ट्सनुसार, प्रियांकाने आता आपल्या मुलीचे नाव ठरवले आहे. प्रियांका आणि निकच्या मुलीचे नाव ‘मालती मेरी चोप्रा जोनास’ असे असणार आहे. मुलीच्या जन्मानंतर प्रियांकाने काही काळ सोशल मीडियावरून ब्रेक घेतला होता.