भोजपुरी अभिनेत्रींचा जलवा बॉलिवूड अभिनेत्रींपेक्षा कमी नसतो. सुषमा अधिकारी (Sushma Adhikari) या भोजपुरी अभिनेत्रीचा देखील इंडस्ट्रीत असाच जलवा आहे. सुषमा ही भोजपुरी फिल्म इंडस्ट्री (Bhojpuri Cinema)मधील प्रसिद्ध नाव आहे. सुषमा भोजपुरीसह नेपाळी सिनेमांमध्ये देखील काम करते. ती सोशल मीडियावर कमालीची सक्रिय असते. आपले बोल्ड फोटो ती नेहमी शेअर करत असते. सुषमानं आपले स्विमिंग पुलमधील बोल्ड लुकवरील फोटो तिच्या इन्स्टावर शेअर केलेत. या फोटोंवर चाहत्यांनी लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केलाय. सुषमानं अनातो प्रेम कथा या नेपाळी फिल्ममधून करिअरची सुरुवात केली. त्यानंतर ती पीपल, खुर्पा, ची मुसी ची, दीवाना आणि जय मधेश अशा अनेक म्यूझिक अल्बममध्ये दिसून आली.