ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प सर्वांनाच भूरळ घालणारं ठिकाण आहे. ताडोबातील वाघांमुळे देशातीलच नव्हे तर परदेशातील पर्यटकही येतात. ताडोबाचं प्रमुख आकर्षण केंद्र म्हणजे माया वाघीण. माया वाघीण ही ताडोबातील सेलिब्रेटी वाघीण आहे. मायाच्या दर्शनासाठी पर्यटकांचा नेहमीच ओढा असतो. माया व्यतिरिक्त ताडोबात मायरा वाघीणीचाही दबदबा आहे. बलराम वाघ ताडोबातील प्रमुख वाघ असून आक्रमकपणामुळे चर्चेत असतो. ताडोबा म्हणजे वाघांचं नंदनवन असल्याचं मानलं जातंय. (Photo Credit- Mahesh Khore ACF TATR)