हापूस आंब्याची किंमत सध्या स्थानिक बाजारात पडलेली दिसून येत आहे



सध्या हापूस आंब्याची 150 ते 300 रुपये प्रति डझन या दराने स्थानिक बाजारपेठेत विक्री होत आहे



शेवटच्या टप्प्यातील हापूस मोठ्या प्रमाणात बाजारात दाखल झाल्याने दर कमी झाला आहे



हापूस ग्राहकांना घेण्यास परवड असला तरी शेतकऱ्यांना मात्र फटका बसताना दिसत आहे.



बाजारपेठेत हापूस आंब्याच्या किंमतीत घसरण होत आहे



आंब्याला कमी दर मिळत असल्यामुळे आंबा उत्पादक शेतकऱ्यांना फटका बसत आहे



पडलेला दर म्हणजे आम्हाला नुकसानकारक असल्याची प्रतिक्रिया शेतकऱ्यांनी दिली आहे.



आंब्याच्या फवारणीचा तरी खर्च निघेल का? याबाबत शेतकरी चिंता व्यक्त करत आहेत.



सुरुवातीला बाजारपेठेत हापूस आंब्याला चांगला दर मिळाला, आता मात्र कमी दर मिळतोय