कोट्यवधींच्या संपत्तीची मालक आणि टी-सीरीजचे चेअरमन भूषण कुमार यांची पत्नी दिव्या खोसला कुमार ही अशा सौंदर्यवतींपैकी एक आहे, जिच्यावर वयाचा प्रभाव पडत नाही.
वयाची 30 वर्षे ओलांडूनही या मुलीचे सौंदर्य एक टक्काही कमी झालेले नाही.
वयाच्या या टप्प्यावरही दिव्या केवळ कमालीची हॉट दिसत नाही,
तर तिची स्टाइल इतकी ट्रेंडी आहे, की तिला 11 वर्षांचा मुलगाही आहे यावर विश्वास ठेवणे कठीण जाते.
तसं असलं तरी कमी वयात लग्न करणाऱ्या या अभिनेत्रीने प्रत्येक पावलावर स्वत:ला सिद्ध केलंय.
अभिनय असो किंवा इतर कलाकारांना अभिनय करायला मिळावा, दिव्या प्रत्येक आघाडीवर सक्रिय असते.
दिव्या खोसला कुमारने तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर तिचे काही फोटो शेअर केले आहेत,
या फोटोंमध्ये तिने पेस्टल पिंक कलरचा रफल गाऊन घातलेला दिसत आहे.
अभिनेत्रीने गळ्यात पोल्कीपासून बनवलेला एक लेयर्ड नेकपीस घातला आहे.