तापसी पन्नू वेगवेगळ्या विषयांवर तिची मत सोशल मीडियावर मांडत असते. तिच्या चित्रापटामधील अभिनयाला प्रेक्षकांची पसंती मिळते. रिपोर्टनुसार, डेनमार्कचा बॅडमिंटनपटू 'मॅथियास बो'ला तापसी डेट करत आहे. नुकत्याच एका मुलाखतीमध्ये तापसीनं तिच्या लग्नाबाबत सांगितलं. ती म्हणाली, 'मला खूप बेसिक पद्धतीनं आणि ड्रामा फ्री पद्धतीनं लग्न करायचे आहे. ' 'कारण माझ्या प्रोफेशनल लाइफमध्ये देखील ड्रामा सुरू असतो. त्यामुळे मला पर्सनल लाइफमध्ये देखील ड्रामा नकोय. ', असंही तिनं सांगितलं. तापसी पन्नूने 2012 साली 'चश्मे बद्दूर' या चित्रपटाच्या माध्यमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. तापसीच्या सांड की आंख, बदला, जुडवा 2 आणि बेबी या चित्रपटांना प्रेक्षकांची पसंती मिळाली. तापसीचा ब्लर हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.