अभिनेत्री स्वरा भास्करनं नुकतेच एक ट्वीट शेअर केलं आहे. स्वरानं ट्वीटच्या माध्यमातून प्रशासनावर निशाणा साधला आहे. स्वरानं ट्वीटमध्ये लिहिलं,'एक्स्ट्रा जुडिशियल किलिंग किंवा एन्काउंटर, या साजऱ्या करण्यासारखी गोष्टी नाहीयेत.' 'राज्याच्या एजन्सींची विश्वासार्हता संपली आहे, हे यातून सूचित होतं.' असंही स्वरानं या ट्वीटमध्ये लिहिलं. स्वरानं पुढे ट्वीटमध्ये लिहिलं, ' हे भक्कम प्रशासन नाही, ही अराजकता आहे.' स्वाराच्या या ट्वीटची चर्चा सध्या सोशल मीडियावर होत आहे. स्वरा ही सोशल मीडियाच्या माध्यमातून विविध विषयांवरील तिची मतं व्यक्त करत असते. स्वराच्या सोशल मीडिया पोस्टमुळे अनेक वेळा नेटकरी तिला ट्रोल करतात. तर काही नेटकरी तिचं कौतुक देखील करतात. स्वरा तिच्या अभिनयानं नेहमीच प्रेक्षकांची मनं जिंकते. विरे दी वेडींग, गुजारिश, तन्नू वेड्स मनू, रांझणा, तनू वेड्स मनू रिटर्न्स, प्रेम रतन धन पायो, नील बट्टे सन्नाटा या चित्रपटांमध्ये स्वरानं काम केलं आहे.