बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री लारा दत्ताचा 45 वा वाढदिवस आहे. लारानं अनेक हिट चित्रपटांमध्ये काम केलं. तिच्या अभिनयाला आणि ग्लॅमरस स्टाईलला प्रेक्षकांची पसंती मिळाली. लारा दत्ताचा जन्म 16 एप्रिल 1978 रोजी गाझियाबादमध्ये झाला. लाराचे वडील एलके दत्ता पंजाबी आहेत. तर तिची आई अँग्लो इंडियन आहे. लाराने अनेक सौंदर्य स्पर्धा जिंकल्या होत्या. 2000 मध्ये तिनं मिस युनिवर्स ही स्पर्धा जिंकली. लाराने अनेक चित्रपटांमध्ये काम केलं. 'नो एंट्री', पार्टनर', 'मस्ती', 'भागम भाग', 'हाऊसफुल', 'लो दिल्ली' या चित्रपटांमुळे तिला लोकप्रियता मिळाली, लारानं 2003 मध्ये अक्षय कुमारसोबत अंदाज या चित्रपटाद्वारे फिल्मी दुनियेत पदार्पण केले. अंदाज या चित्रपटामधील एका गाण्याच्या शूटिंगदरम्यान समुद्राच्या जोरदार लाटांमुळे लाराचा तोल गेला आणि ती पाण्यात पडली. अक्षय कुमारने तात्काळ पाण्यात उडी मारून तिचा जीव वाचवला. दिग्दर्शक सुनील दर्शन यांनी एका मुलाखतीदरम्यान हा किस्सा सांगितला होता. लाराचा चाहता वर्ग मोठा आहे.