भूमी ही तिच्या विविध लूकमधील फोटो सोशल मीडियावर शेअर करते. नुकतेच भूमीनं तिच्या खास लूकमधील काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहे. भूमीनं बार्बी डॉलच्या लूकमधील फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले. भूमीनं हे फोटो शेअर करुन कॅप्शनमध्ये लिहिलं, 'In my Barbie era' भूमीनं शेअर केलेल्या फोटोमध्ये ती ऑल पिंक आऊटफिटमध्ये दिसत आहे. भूमीच्या या लूकला नेटकऱ्यांची पसंती मिळाली आहे. भूमीनं या फोटोमध्ये तिच्या नावाचं पेंडेन्ट असणारे गळ्यातले आणि पिंक इअरिंग्स घातलेल्या दिसत आहेत. भूमीच्या या लूकवर नेटकऱ्यांनी लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे. 2014 मध्ये प्रदर्शित झालेल्या दम लगा के हैशा या चित्रपटामधून भूमीनं बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. भूमी ही तिच्या ग्लॅमरस स्टाईलनं प्रेक्षकांची मनं जिंकते.