बॉलिवूड अभिनेत्री सनी लियोनी म्हणजे, लाखो चाहत्यांच्या गळ्यातील ताईत.
वयाची चाळीशी ओलांडल्यानंतरही सनी सौंदर्यांच्या बाबतीत भल्या भल्या अभिनेत्रींना टक्कर देते.
अभिनेत्री आणि मॉडेल सनी लियोनी या लूकमध्ये क्लासी दिसतेय.
न्यूड कलरच्या ड्रेसमध्ये सनीचं सौंदर्य आणखी खुललं आहे.
सनी लिओनीचे इंस्टाग्रामवर 54 मिलियनपेक्षा जास्त फॉलोअर्स आहेत. बोल्ड अभिनेत्री म्हणून सनी लोकप्रिय आहे.
'एडल्ट' या सिनेमाच्या माध्यमातून तिने हिंदी सिनेसृष्टीत पदार्पण केलं आहे. अल्पावधीतच तिने बॉलिवूडमध्ये स्वत:ची वेगळी ओळख निर्माण केली आहे.
सनी लिओनी नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असते. सनीचा 'द बॅटल ऑफ भीमा कोरेगाव' (The Battle of Bhima Koregaon) हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
. या सिनेमात ती अर्जुन रामपालसोबत स्क्रीन शेअर करताना दिसणार आहे.
नुकतीच तिची 'अनामिका' ही वेबसीरिज प्रेक्षकांच्या भेटीला आली होती या वेबसीरिजमध्ये बोल्ड सनीचा अॅक्शन मोड पाहायला मिळाला. सनी अभिनय, नृत्य आणि शोजमधून कोट्यवधी रुपये कमावते.