सनी लिओनची IFFSA टोरंटो गाला रेड कार्पेट आणि कॉकटेल रिसेप्शन इव्हेंटमध्ये डिझायनर फौद सरकीसच्या जबरदस्त पोशाखात हजेरी ती एका लिलाक स्वीटहार्ट ऑफ-द-शोल्डर गाउनमध्ये होती,ग्लॅमरस दिसत होती. ती फेस्टिव्हलमध्ये प्रीमियर झालेल्या तिच्या केनेडी या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी आली चित्रपटातील कास्ट आणि क्रूसोबत सनी लिओनी तिथे आली. या ग्लॅमरस इव्हेंटसाठी प्रसिद्ध स्टायलिस्ट चांदनी मेहताने सनीला स्टाइल केले. राशी गुप्ता यांनी डिझाइन केलेल्या पिंकलेन ज्वेलरीसोबत सनीने तिचा लुक पूर्ण केला. अलीकडेच तिचा म्युझिक व्हिडिओ “मेरा पिया घर आया 2.0” ने इंटरनेटवर खूप लोकप्रियता मिळवली. तिचा आगामी चित्रपट कोटेशन गँग द्वारे तमिळ चित्रपटसृष्टीत महत्त्वपूर्ण प्रभाव पाडण्यासाठी ती सज्ज ज्यात जॅकी श्रॉफ, प्रियामणी आणि सारा अर्जुनसारखे दिग्गज कलाकार आहेत तिच्या चाहत्यांना चित्रपटाची उत्सुकता लागली आहे.