सिनेसृष्टीतील अनेक अभिनेत्री कपडे, ज्वेलरीवर मोठ्या प्रमाणात पैसे खर्च करतात. एखाद्या पार्टीत किंवा कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी त्या लाखो रुपये खर्च करतात. या सेलिब्रिंटीकडून प्रेरित होऊन तरुण मंडळीदेखील त्यांच्या लूकवर पैसे खर्च करतात. पण अभिनेत्री झीनत अमान मात्र या गोष्टीला अपवाद आहेत. झीनत कपडे आणि दागिने उधारीवर घेतात. झीनत यांनी पुढे लिहिलं आहे,मी डिझायनर आऊटफिट परिधान करते. ते कपडे मी उधारीवर घेते. दागिनेदेखील मी भाड्याने घेते, तरुणांनी कपड्यांवर जास्त खर्च करू नये. तरुणांनी बँक खातं रिकामं करू नये. चांगले कपडे परिधान करायचे असतील तर ते भाड्याने घ्या. (Photo credit : Instagram/thezeenataman)