उन्हाळा सुरु झाला आहे. एप्रिल महिन्यात तापमानाचा पारा विक्रमी उच्चांकावर पोहोचला आहे. दिवसेंदिवस वाढत असलेल्या तापमानात आपल्या आरोग्याची काळजी घेणं खूप गरजेचं आहे. या ऋतूमध्ये पोटाच्या समस्या जास्त होतात. उन्हाळ्यात तोलून मापून अन्न खावं लागतं. तुम्हाला अशाच काही सुपरफूड्सबद्दल सांगणार आहोत, ज्याचे सेवन केल्याने तुमचे पोटही थंड राहिल आणि तुम्ही निरोगीही राहाल. उन्हाळ्यात बरीच हंगामी फळं बाजारात विकली जातात. त्यामुळे तुम्ही कलिंगड, द्राक्षे, संत्री, खरबूज यासारखे फळे खा. उन्हाळ्यात कोशिंबीर भरपूर खा. काकडी, झुकिनी आणि पाण्याचे प्रमाण जास्त असलेल्या भाज्या खा. उन्हाळ्यात तुम्ही नारळाचे पाणी जरुर प्यावे, त्यात इलेक्ट्रोलाईट्स असतात, ते तुम्हाला हायड्रेट ठेवण्यास मदत करु शकतात. दुपारच्या किंवा रात्रीच्या जेवणात दहीचं सेवन अवश्य करा. दही हा प्रोबायोटिक्सचा चांगला स्रोत आहे जो आतडे निरोगी राखण्यात मदत करु शकतो. उन्हाळ्यात तुमच्या जेवणात पुदिन्याच्या चटणीचा नक्कीच समावेश करा. त्यामुळे पोट थंड ठेवण्यास मदत होते.