अनेकांना पिझ्झा, बर्गर आणि फ्रेंच फ्राइजसोबत टोमॅटो (Tomato) केचप खाण्यची आवड असते.
टोमॅटो केचपचा टँगी फ्लेवर अनेकांना आवडतो. पण टोमॅटो केचप जास्त खाल्यानं तुमच्या आरोग्यावर (Health Tips) वाईट परिणाम होईल.
टोमॅटो केचप म्हणजेच टोमॅटो सॉस खाल्ल्याने शरीरात सोडियम आणि साखरेचे प्रमाण वाढते. यामुळे टोमॅटो केचप खाणं आरोग्यासाठी हानिकारक मानले जाते.
टोमॅटो केचप बनवण्यासाठी केमिकल्स आणि प्रिझर्वेटिव्ह्जचा वापर केला जातो, ज्यामुळे मधुमेह, लठ्ठपणा यांसारख्या समस्यांचा सामना करावा लागू शकतो. त्यामुळे टोमॅटो केचप जास्त खाणे टाळावे.
टोमॅटो केचपमध्ये साखरेचे प्रमाण जास्त असते. तसेच त्यामध्ये साखरेसोबत भरपूर मीठ असते. जास्त मिठामुळे उच्च रक्तदाबाचा धोका निर्माण होऊ शकतो.
टोमॅटो केचप बनवण्यासाठी डिस्टिल्ड व्हिनेगर आणि फ्रक्टोज शुगर जास्त प्रमाणात वापरली जाते. यासोबतच रेग्युलर कॉर्न सिरप आणि कांद्याची पावडरही वापरली जाते. हे GMO कॉर्नपासून बनवले जाते. ज्यामध्ये भरपूर केमिक्स वापरली जातात.
टोमॅटो केचपमध्ये प्रथिने, फायबर किंवा खनिजे जास्त प्रमाणात नसतात. यामध्ये साखर आणि सोडियमचे प्रमाण जास्त असते, त्यामुळे किडनीवरही परिणाम होऊ शकतो.
टोमॅटो केचप बनवण्यासाठी सर्व प्रथम टोमॅटो गरम पाण्यात टाकून ते उकळले जाते. यानंतर त्याच्या बिया आणि कातडे काढून त्याला शिजवले जातात. या संपूर्ण प्रक्रियेस अनेक तास लागतात. त्यामुळे टोमॅटोचे पोषक तत्व नष्ट होतात.
टोमॅटो केचप ऐवजी टोमॅटो सूप, टोमॅटोची भाजी, टोमॅटो टाकून केलेलं सॅलड, टोमॅटोची चटणी इत्यादी टोमॅटोपासून तयार करण्यात आलेले पदार्थ तुम्ही खाऊ शकता.