'मावळं जागं झालं रं' या गाण्याने You Tube वर 950k+ चा टप्पा ओलांडला आहे अभिनेता चिन्मय मांडलेकरने 'मावळं जागं झालं रं' या गाण्याची झलक सोशल मीडियावर शेअर केली आहे. व्हिडीओ शेअर करत त्याने लिहिलं आहे,18 ऑगस्टला गाजणार सिंहगडाचा पोवाडा... 'सुभेदार' हा सिनेमा आधी 25 ऑगस्टला प्रेक्षकांच्या भेटीला येणार होता. पण लोकाग्रहास्तव हा सिनेमा आता 18 ऑगस्टला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. आता सिनेमाची रिलीज डेट बदलत 'सुभेदार'च्या टीमने चाहत्यांना आनंदाची बातमी दिली आहे. 'सुभेदार' या सिनेमात अभिनेते अजय पुरकर (Ajay Purkar) तानाजी मालुसरे यांच्या भूमिकेत दिसणार आहे. काही दिवसांपूर्वी या सिनेमातील त्यांचा लूक आऊट करण्यात आला होता. हातात तलवार, नजरेत धगधगनारी आग अशा त्यांच्या लूकने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं होतं. चिन्मय मांडलेकर या सिनेमात शिवाजी महाराजांच्या भूमिकेत दिसणार आहे. सिनेप्रेमींना आता या बहुचर्चित सिनेमाची प्रतीक्षा आहेत. 'सुभेदार' सिनेमातील पहिलंवहिलं गाणं प्रेक्षकांच्या भेटीला